वेबसाईट
Table of Contents
बिझनेस साठी वेबसाईट का लागते हा विचार बऱ्याच लोकांच्या मनात भेडसावत असतो कारण की वेबसाईट बनवण्यासाठी पैसे इन्वेस्ट करावे लागतात तिला टेक्निकली बिल्ड करावी लागते.
बऱ्याच लोकांना असे वाटते की आपला बिजनेस आधीच खूप चालत आहे तर बिझनेस साठी वेबसाईट कशाला हवी अशा प्रकारचे बरेच काही विचार लोकांच्या मनात येतात.
पण असा विचार न करता, नेहमी कोणताही बिजनेस करताना कस्टमर च्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
वेबसाईट चे फायदे
वेबसाईटमुळे कस्टमरला तुमचे लोकेशन समजू शकते तसेच वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करण्यासाठी माहिती दिलेली असते ती बघून कस्टमर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो.
तुमच्या बिजनेस मध्ये जर तुम्ही नवीन प्रोडक्ट ऍड केले तर तुम्ही तुमच्या प्रोडक्ट आणि सर्विसेस वेबसाईटवर दाखवू शकतात त्यामुळे तुमच्या कस्टमरला बरीच माहिती ही वेबसाइट असल्याकारणाने समजते.
तुमच्या जुन्या कस्टमर्स चे तुमच्या सर्विस बद्दलचे रिव्ह्यूज तसेच फीडबॅक वेबसाईट वर डिस्प्ले होतात त्यामुळे तुमचा नवीन कस्टमर तुमच्याकडे आकर्षित होतो.
हे सगळे पॉईंट कस्टमर साठी खूप महत्त्वाचे आहेत. ही सगळी महत्त्वाची माहिती तुम्ही वेबसाईटवर टाकू शकतात
वेबसाईटची गरज असण्याची मुख्य कारणे
1. तुमच्या प्रोडक्ट आणि सर्विसेस ची जागरूकता
जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही एखादा बिजनेस स्टार्ट करतात तेव्हा लोक तुमच्या प्रोडक्ट आणि सर्विसेस मध्ये इंटरेस्टेड असतात. तुम्ही तुमचे प्रोडक्ट आणि सर्विसेस तुमच्या वेबसाईट च्या माध्यमातून प्रदर्शित करू शकतात.
कोणत्याही बिझनेसची पहिली छाप ही खूप महत्त्वाची असते, कस्टमर ला अचूक कल्पना येते की तुम्ही कोणते प्रोडक्ट विकतात आणि तुम्ही काय व्यवसाय करतात.
2. कुठल्याही बिझनेस साठी विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो
तुमचे खूप सारे बिजनेस असतील पण ते व्यवस्थित रित्या प्रदर्शनास नाही मांडले तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण जर तुम्ही तुमचे प्रोडक्ट आणि सर्विसेस व्यवस्थित रित्या लोकांसमोर वेबसाईटच्या माध्यमातून मांडले तसेच तुमच्या व्यवसायाची माहिती वेबसाईटवर पुरवली तर तुमच्यावरचा लोकांचा विश्वास वाढतो.
तसेच तुमच्या प्रोडक्ट वर कस्टमर ने दिलेले रिव्यू , कॉमेंट तसेच फीडबॅक वाचून नवीन कस्टमर तुमचे प्रोडक्ट घेऊ शकतात.
3. 24 /7 hrs तुम्ही तुमचे शॉप वेबसाइटच्या माध्यमातून सुरू ठेवू शकतात
तुमचे जर स्थायिक शॉप असेल तर ते दिवसातून काही तासांसाठी ओपन असते पण तुमच्या बिजनेस ची जर वेबसाईट असेल तर कस्टमर 24/7 hours म्हणजेच कधीही तुमच्या वेबसाईटला भेट देऊन तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती घेऊ शकतात.
इंटरनेटवर तुमच्या व्यवसायाची उपस्थिती ती ही खूप महत्त्वाची आहे तुमच्या बिझनेस साठी.
त्यामुळे तुमचे मार्केटिंग चांगल्याप्रकारे होते तसेच लोकांमध्ये तुमच्या बिजनेस बद्दल जागरूकता निर्माण होते.
4. वेबसाइटच्या माध्यमातून नवीन कस्टमर आणि पैसे कमवू शकतात.
वेबसाइटच्या माध्यमातून नवीन कस्टमर तुम्हाला भेटू शकतात आणि जर तुम्ही वेबसाईट वर तुमच्या बिजनेस बद्दल व्यवस्थित माहिती टाकली असेल तर तेच कस्टमर तुमचे प्रॉडक्ट विकत घेतात.
आणि वेबसाईटचा वापर करून तुम्ही तुमची ऑनलाईन कमाई सुरू करू शकतात.
5. वेबसाईट खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असते.
बऱ्याच वेळेस काय होते लोक म्हणतात की वेबसाइट साठी खर्च करावा लागतो पण तुम्ही केलेला हा खर्च तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स फायदा करून देतात.
तुमचा बिझनेस हा सोशल प्लॅटफॉर्म वर दिसतो जसे की फेसबूक, इंस्टाग्राम इत्यादी आणि यामुळे तुमचे नवीन कस्टमर तयार होतात आणि त्यानंतर त्याच कस्टमर चे लीड मध्ये रूपांतर होते.
6. कमी वेळेमध्ये जास्त कस्टमर पर्यंत पोहोचू शकतात.
तुम्ही तुमच्या कस्टमर सोबत कनेक्टेड राहू शकतात मेल किंवा मेसेंजर च्या माध्यमातून.
कसे तर तुमचा मेल आयडी व मॅसेज साठीची माहिती वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेली असते.
कस्टमर तुम्हाला त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून कधीही विचारू शकतात.
ज्याचा रिप्लाय तुम्ही कमी वेळात कस्टमरला देऊ शकतात.
त्यामुळे काय होते तर कस्टमर चा विश्वास तुमच्यावर बसतो. तसेच ग्राहक समाधान लाभते.
कस्टमर केव्हाही कुठेही तुमच्या व्यवसाय बद्दल माहिती मिळवू शकतात.
7. तुमच्या बिझनेसचे नाव हे गुगल सर्चमध्ये दिसते.
जेव्हापण कस्टमरला काही प्रॉडक्ट विकत घ्यायचे असते तेव्हा कस्टमर आजच्या काळात गुगल वर सर्च करतो.
त्यामुळे तुमचा बिजनेस चे नाव गुगल वर गुगल सर्च मध्ये दिसणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचू शकतात.
गुगल रिझल्ट मध्ये टॉप वर दिसण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन महत्वाचे असते.
आणि जर व्यवस्थित कीवर्ड रिसर्च तुमची वेबसाईट बनवलेली असेन तर तुम्ही खूप महत्त्वाच्या कस्टमर्स पर्यंत वेबसाईट या माध्यमातून पोहोचू शकतात आणि तुमचा बिजनेस वाढवू शकतात.
Related Post: Why do you need website?
Comment (1)
Leave a comment
You must be logged in to post a comment.
#1 Importance of website for your business is need in digital world
May 1, 2024[…] You can have a look details on Importance of website in Marathi बिझनेस साठी वेबसाईट ची (संकेतस्थळाची) … […]