तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल?
Table of Contents
1.बिजनेस ऑनलाइन नेण्यासाठीचे ध्येय आणि रणनीती निश्चित करा.
तुमच्या ब्रँड किंवा बिजनेस ध्येय निश्चित करा
तुमच्या स्पर्धकांचा योग्य अभ्यास करा.
तुमचा बजेट आणि त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक तयार करा.
2.तुमचा बिझनेस ऑनलाइन नेण्यासाठी योग्य तो प्लॅटफॉर्म निवडा.
3.पोटेन्शिअल कस्टमर बद्दल माहिती
4.तुमच्या या वेबसाईटवर वर ऑरगॅनिक ट्राफिक आणण्यासाठी प्रयत्न करा.
5.डिजिटल मार्केटिंग ची रणनीती निश्चित करा
कन्टेन्ट मार्केटिंग
सोशल मीडिया या मार्केटिंग
पे पर क्लिक मार्केटिंग
ईमेल मार्केटिंग
परफॉर्मन्स मेजर पद्धत
ताज्या अहवालानुसार इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 560 दशलक्ष पर्यंत वाढलेली आहे. आणि भारत देश, त्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे कारण पुरेसे आहे तुमचा बिजनेस ऑनलाइन नेण्यासाठी. जरी तुमचं उद्योग सुरुवातीच्या टप्प्यात असेल किंवा छोटा जरी असेल तरीसुद्धा ऑनलाइन मार्केटिंग तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.आणि या पोस्टमध्ये तुम्हाला या प्रश्नाच उत्तर सापडेल, तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल?
आपली ऑनलाइन बिझनेस वाढवण्याच्या पायऱ्या:
1.बिजनेस ऑनलाइन नेण्यासाठीचे ध्येय आणि रणनीती निश्चित करा.
बिझनेस ऑनलाईन नेण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. तुमच्या बिझनेसच्या प्रकारानुसार मार्केट रिसर्च करून तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल? बिझनेसचा प्लान बनवावा लागेल आणि त्यानुसार पुढच्या कार्यपद्धती कराव्या लागतील.
1.1 तुमच्या ब्रँड किंवा बिजनेसचे ध्येय निश्चित करा
तुम्हाला स्पष्टपणे माहिती असलं पाहिजे तुम्ही बिजनेस ऑनलाइन का नेणार आहात? तुम्हाला तुमचा ब्रँड इंट्रोड्युस करायचा आहे का म्हणजे ब्रँड अवेअरनेस? किंवा तुमचं सेल वाढवायचा आहे का? तुमच्या या कस्टमरचा विश्व वास किंवा रेटिंग मिळवायच्या आहेत का? सोशल मीडिया चे फॉलॉवर वाढवायचे आहेत का? यासारखे गोष्टी ही तुमचे बिजनेस ऑनलाइन लिहिण्यासाठी चे ध्येय असू शकते. योग्यरीतीने केलेलं ध्येयनिश्चिती आणि प्लान,मार्केटिंग रणनीती आखण्यासाठी मदत करते. म्हणूनच पूर्ण काळजीने आणि स्मार्ट पद्धतीने ह्या गोष्टी आखाव्यात.
1.2 तुमच्या स्पर्धकांचा योग्य अभ्यास करा
ऑनलाइन मार्केटिंग मध्ये पदार्पण करण्याआधी स्पर्धकांचा योग्य रीतीने अभ्यास केलेला केव्हाही चांगलं असतं. तुमच्या मार्केटिंग रणनीति आखण्या करता या गोष्टीची खूप जास्त जास्त मदत होते. आम्ही तुम्हाला तुमच्या स्पर्धकांची कॉपी करण्यास सांगत नाही आहोत. पण ते कशा पद्धतीने बिझनेस ऑनलाईन पुढे नेत आहेत याचा अभ्यास नक्कीच फायदेशीर ठरतो.
1.3 तुमचा बजेट आणि त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक तयार करा.
वेळ आणि पैसा या दोघेही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत कोणत्याही बिझनेस करता. तुम्ही ही या दोन्ही गोष्टींवर योग्यरितीने काम केलं तर नक्कीच यश मिळणार.तुमच्या मार्केटिंग बजेट डोक्यात ठेवून, मार्केटिंग ध्येय आणि स्पर्धकांचा योग्य अभ्यास केल्यानंतर मार्केटिंग रणनीतीसाठी योग्य ते वेळापत्र बनवणं गरजेचं आहे.तुमचं लिमिटेड बजेट असल तरी ऑनलाइन मार्केटिंग नीट चालू शकते, फक्त तुम्हाला खालील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ह्या गोष्टी म्हणजे तुमचं टारगेट ऑडियन्स, कन्टेन्ट क्वालिटी आणि संयम ठेवून चाचणी करणे. तुमचं बजेट योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी,त्याचं वेळापत्रक सुद्धा योग्य रीतीने आखायला हवं. म्हणजे कोणत्या वेळी किती पैसे आणि कोणत्या ध्येयासाठी साठी खर्च होतात ते ह्याची खात्री जमा करावी. तुम्ही अश्या प्रकारे तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल.
2.तुमचा बिझनेस ऑनलाइन नेण्यासाठी योग्य तो प्लॅटफॉर्म निवडा.
ऑनलाइन इन मार्केटिंग साठी बरेच प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध आहेत. पण त्यातला योग्य प्लॅटफॉर्म निवडणं हे थोडा जिकरीचं काम आहे. कोणता प्लॅटफॉर्म निवडावा, हे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कोणत्या टप्प्यावर आहात त्यावरून ठरवता येत.
कोणत्याही केसमध्ये चांगली वेबसाईट असणे हे तुमच्या ब्रँड साठी योग्य प्रकारे सुरुवात होऊ शकते. ते वर्डप्रेस वेबसाईट या नवीन फीचर्स आणि सुंदर डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत.आणि वर्डप्रेस वेबसाईटचा मार्केट मधला वेबसाईट संबंधित वाटा हा 38 टक्के आहे.आणि लिमिटेड बजेटमध्ये एक एक विश्वसनीय वर्डप्रेस वेबसाईट बनवता येतील.
तर असे तुम्ही बघू शकता कि अश्या प्रकारे तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल.
3. पोटेन्शिअल कस्टमर बद्दल माहिती
तुमचा बिजनेस ऑनलाइन येण्यापूर्वी ह्या महत्वाच्या मुद्द्याची अभ्यास असणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात नक्कीच येईल का आणि कसा? तर याचे उत्तर आहे, ऑनलाइन मार्केटिंग मध्ये आपल्याला आपल बिझनेस ऑडियन्स ठरवताय येतो, जे आपण पण आपल्या जुन्या मार्केटिंग पद्धतींमध्ये करत नव्हतो. यामुळे आपले मार्केटिंगचे प्रयत्न व पैसा योग्य दिशेला लागतो. त्यामुळे आपल्या ब्रँड ऑडियन्सचे छंद,आवड आणि आणि नेट वरचा वावर म्हणजे ब्राउझिंग पॅटर्न आणि वेळ याचा अभ्यास हवा. याशिवाय त्यांचं ग्राफिकल लोकेशन आणि भाषा याबद्दल सुद्धा माहिती हवी. आणि जेव्हा तुम्ही तुमचे मार्केटिंग प्लान पुढे याल तेव्हा या माहितीचा योग्य ठिकाणी वापर करा.
4.तुमच्या या वेबसाईटवर वर ऑरगॅनिक ट्राफिक आणण्यासाठी प्रयत्न करा.
याचा अर्थ असा की पैसे न लावता ऑर्गानिकली तुमच्या वेबसाईट वरचे विजिटर वाढवा. सर्च इंजिन चा असा नियम आहे की वेबसाईट ही चांगली,क्वालिटी असणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसचा संबंधित व योग्य कन्टेन्ट किंवा माहिती दाखवणारी असावी. या गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर तुमच्या वेबसाईटला सर्च इंजिन वर नक्कीच चांगला नंबर मिळू शकतो. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर एस.ई.ओ. फ्रेंडली वेबसाईट.
5.डिजिटल मार्केटिंग ची रणनीती निश्चित करा
डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून तुम्ही तुमचा योग्य ऑडियन्स पर्यंत पोचू शकता तेही ही कमी पैशात आणि योग्य मेजरमेंट करून. आत्ता आपल्याला ऑनलाइन मार्केटिंग साठी बरेच प्लॅटफॉर्म अथवा मार्ग अवेलेबल आहे. येणाऱ्या पुढील पोस्टमध्ये आपण खालील डिजिटल मार्केटिंगच्या पद्धती अजून खोलात जाऊन शिकूया. तोपर्यंत तुमचा बिझनेस ऑनलाइन येण्या साठी प्लानिंग आणि मार्केट ची माहिती जमावा.
- कन्टेन्ट मार्केटिंग
- सोशल मीडिया या मार्केटिंग
- पे पर क्लिक मार्केटिंग
- ईमेल मार्केटिंग
- परफॉर्मन्स मेजर पद्धत
तर हे आहे तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल ह्याबद्दल.
तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील कि तुमचा बिझनेस ऑनलाइन कसा वाढवाल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता