ईमेल मार्केटिंगचे महत्त्व
Table of Contents
जवळजवळ प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याचे ईमेल खाते असते. आणि येणाऱ्या काही वर्षांत ती नक्कीच वाढेल.ही बाब डिजिटल मार्केटर्सना त्यांच्या प्रॉस्पेक्ट्सची पूर्तता करण्याची चांगली संधी देते.ब्रँड आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये चांगला संबंध राखण्यासाठी ईमेल मार्केटिंग महत्त्वपूर्ण आहे. यामुळे त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते आणि ते सुद्धा त्यांना योग्य असलेल्या वेळी,ईमेल इनबॉक्स वापरून.ईमेल मार्केटिंगचे महत्त्व सखोलपणे जाणून घेऊया.
या डिजिटल मार्केटिंग युगात व्यवसाय किंवा ब्रँड कधीही एकच डिजिटल मार्केटिंग चॅनेल वापरत नाहीत. ते एक डिजिटल रणनीती किंवा स्टॅटेजि बनवतात आणि त्यानुसार या भिन्न डिजिटल चॅनेल वापरतात. इतर डिजिटल चॅनेलच्या अनुषंगाने ईमेल मार्केटिंग कशी भूमिका बजावते ते पुढे पाहूया.
कंटेंट मार्केटिंग
योग्य वेळी, योग्य लोकांपर्यंत मजकूर पोहोचवण्याचा ईमेल हा एक अचूक मार्ग आहे. ब्लॉग पोस्ट्स किंवा लेखांना प्रोत्साहन देण्यासाठी, ईमेल हा एक चांगला पर्याय आहे. जबरदस्त ईमेल टेम्पलेट्स, वृत्तपत्रे आणि आरएसएस फीड्स वापरुन आपण आपली सामग्री प्रदर्शित करू शकता.
वेबिनार आणि इंटरनेट इव्हेंटचे आमंत्रण
आजकाल वेबिनार आणि कोणतेही इंटरनेट इव्हेंट,हे डिजिटल मार्केटिंगच्या धोरणाचा भाग म्हणून सादर केला जातो. परंतु वेळ आणि महत्वपूर्ण माहीती संबंधित प्रेक्षकांशी योग्य वेळेत सूचित करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. अर्थात, अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल मीडिया पोस्ट्स, परंतु आपण या चॅनेलवर वैयक्तिकपणे माहिती सादर करू शकत नाही. तसेच अशा जाहिराती प्रत्येक युजर बघेलच अस नाही आणि जाहिरातींच्या किंमतीही द्याव्या लागतात.तर, अशा आमंत्रणासाठी ईमेल मार्केटिंग चँनेल एक चांगला उपाय आहे.
आपल्या प्रेक्षकांना बद्दल शिकण्यास सुलभ
ईमेल सर्विस प्रॉव्हिडर प्रत्येक ईमेल मोहिमेसाठी अहवाल प्रदान करतात.याचा वापर करून आपणास आपल्या ईमेल प्रेक्षकांबद्दल सहज माहिती मिळू शकेल.यामुळे आपणास आपल्या आगामी मोहिमेतील कामगिरी सुधारण्यास मदत होते.ह्या अहवालांचा वापरकरून आपण आपल्या सक्रिय आणि एंगेज सदस्यांचा मागोवा ठेवू शकता, ज्यामुळे पुढील मार्केट रीटारगेटिंगमध्ये मदत होते.तसेच आपण आपल्या ब्रँडशी संबंधित पॅटर्न, नमुने आणि ट्रेंड कॅप्चर करू शकतो.आपल्या आगामी मार्केटिंग धोरणासाठी हे सर्व चांगला इनपुट आहेत.
सोशल मीडिया
आपल्याला ईमेल सर्विस प्रॉव्हिडरकडून विविध प्रकारचे प्रीमेड ईमेल टेम्पलेट लेख प्राप्त होतात. या गोष्टींचा वापर करून कोणतीही ईमेल कॅम्पियन आपण आपल्या सोशल मीडिया साईट लिंक करू शकतो.
या व्यतिरिक्त ईमेल मार्केटिंग डिझाइन करणे आणि अंमलात आणणे अगदी सोपे आहे. तसेच हे सर्वात किफायतशीर डिजिटल मार्केटिंग चॅनेल आहे. छोट्या व्यवसायांसाठी ते चांगले, स्मार्ट आणि सुरक्षित व्यासपीठ आहे.अशाप्रकारे ईमेल मार्केटिंगचे महत्त्व वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ईमेल मार्केटिंग अद्याप महत्त्वाचे का आहे याबद्दल येथे अधिक जाणून घ्या.
ईमेल मार्केटिंगचे महत्त्व ह्या बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.